Maharashtra GK in Marathi
Q. कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
उत्तर: कोयना
Q. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ?
उत्तर: रेगूर मृदा
Q. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली ?
उत्तर: उल्कापातामुळे
Q. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
उत्तर: डहाणू – घोलवड
Q. यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?.
उत्तर: अमरावती
Q. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती ?
उत्तर: 36
Q. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
उत्तर: पूर्व विदर्भ
Q. वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे?
उत्तर: वर्धा – अमरावती
Q. ‘समृद्धी महामार्ग’ या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे?
उत्तर: MSRDC
Q. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (National Institute of Virology) हे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: पुणे
Q. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: वारणा
Q. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते.
उत्तर: पर्जन्यछायेचा प्रदेश
Q. पुर्णा, पांजरा, दुधना, गिरणा यापैकी कोणती तापीची उपनदी नाही ?
उत्तर: दुधना
Q. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
उत्तर: वैनगंगा
Q. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. कोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही?
उत्तर: आंध्र प्रदेश
Q. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
उत्तर: 1981
Q. कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा?
उत्तर: श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण
Q. कोण महाराष्ट्रातील रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही?
उत्तर: MSSC
Q. राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे?
उत्तर: मुंबई, औरंगाबाद, नागपूर
Q. भाभा अणु संशोधन केंद्र ……..येथे आहे..
उत्तर: मुंबई
Q. पैणगंगा नदीचा उगम…… डोंगरात आहे.
उत्तर: अजिंठा डोंगर
Q. मुळा, मुठा, घोड, नीरा या …..नदीच्या उपनद्या आहे.
उत्तर: भीमा
Q. राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था ………… येथे आहे.
उत्तर: पुणे
Q. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
उत्तर: जायकवाडी
Q. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो?
उत्तर: नृसिंहवाडी
Q. पेंच, रणथंबोर, मेळघाट, ताडोबा पैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही?
उत्तर: रणथंबोर
Q. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अहमदनगर
Q. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर: नाशिक
Q. अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापैकी कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही?
उत्तर: सिंधुदुर्ग
Q. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
उत्तर: अहमदनगर
Q. यापैकी कोणते तलाव त्याच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत?
लोणार – बुलढाणा,
लोकटक – रत्नागिरी,
रंकाळा – कोल्हापूर,
अंबाझरी – नागपुर
उत्तर: लोकटक – रत्नागिरी
Q. महाराष्ट्राची किनारपट्टी………म्हणून ओळखली जाते.
उत्तर: कोकण किनारा
Q. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
उत्तर: सातपुडा
Q. महाबळेश्वर – महाड मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तर: आंबेनळी