Maharashtra GK in Marathi
Q. डहाणू तालुका कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तर: चिकू
Q. कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे?
उत्तर: देहू
Q. ‘कळसुबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: अहमदनगर
Q. वैष्णवी पाटील, प्रतिक्षा बागडी, अमृता पुजारी, प्रतिक्षा राक्षे यापैकी कोण पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ ठरली ?
उत्तर: प्रतिक्षा बागडी
Q. रायगड जिल्हयात भिरा, भिवपुरी, रसायनी, खोपोली यापैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही ?
उत्तर: रसायनी
Q. कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली ?
उत्तर: 1998
Q. रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता ?
उत्तर: ताम्हीणी
Q. मुंबई – गोवा हायवे हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो ?
उत्तर: NH 66
Q. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाची सिमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे?
उत्तर: वैनगंगा
Q. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
उत्तर: पांझरा
Q. मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर: 1973
Q. नुकतेच कोणत्या गीतास ‘महाराष्ट्राचे राज्यगीत’ म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
उत्तर: जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा (राजा बढे)
Q. वर्धा नदीची वर्धा जिल्हयामध्ये वाहण्याची दिशा …..आहे.
उत्तर: वायव्येकडून आग्नेयेकडे
Q. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: सातारा
Q. वाशिम जिल्हयातील अडाण धरण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर: कारंजा
Q. वाशिम जिल्हयाची निर्मीती कधी झाली ?
उत्तर: 01 जुलै 1998
Q. किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या …….यांना आपण राष्ट्रसंत म्हणुन ओळखतो.
उत्तर: संत तुकडोजी महाराज
Q. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले आगळेवेगळे…..गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
उत्तर: पुस्तकाचे
Q. गडचिरोली जिल्हयाची स्थापना कधी व कोणत्या जिल्हयाचे विभाजन करुन झालेली आहे.
उत्तर: 1982, चंद्रपूर
Q. संत्रा उत्पादनसाठी प्रसिध्द असणारे शहर कोणते आहे ?
उत्तर: नागपूर
Q. गाढवी, वाघ, प्रवरा, अंधारी यापैकी कोणती वैनगंगेची उपनदी नाही?
उत्तर: प्रवरा
Q. फडीमुन्शी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधीत आहे?
उत्तर: तेंदूपत्ता संकलन
Q. भामरागड, नंदुरमधमेश्वर, बोर, नागझिरा यापैकी कोणते वन्य जीवन अभयारण्य नागपूर विभागात येत नाही?
उत्तर: नंदुरमधमेश्वर
Q. पारस, कोराडी, दुर्गापुर, परळी यापैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही?
उत्तर: परळी
Q. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती ?
उत्तर: प्राणहिता