Maharashtra GK in Marathi
Q. छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म किल्यावर झाला.
उत्तर: शिवनेरी
Q. कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
उत्तर: आंबोली
Q. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
उत्तर: हरियाल
Q. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?
उत्तर: पुणे – महाबळेश्वर
Q. वैतरणा, ताणसा, कोयना, शास्त्री यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
उत्तर: कोयना
Q. सातारा जिल्ह्यातील धरणे कोणती ?
उत्तर: कोयना, धोम, कन्हेर, वीर
Q. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते आहे ?
उत्तर: ब्ल्यू मॉरमॉन
Q. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ?
उत्तर: 6
Q. कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
उत्तर: पितळखोरा
Q. महागणपती, मयुरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर यापैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.
उत्तर: बल्लाळेश्वर
Q. कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?
उत्तर: इचलकरंजी
Q. तुळापूर मध्ये…….नद्यांचा संगम आहे.
उत्तर: भीमा व इंद्रायणी
Q. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर: 36
Q. मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ?
उत्तर: मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे
Q. तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: बैतुल जिल्हा (म.प्रदेश )
Q. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?
उत्तर: बॉम्बे हेरॉल्ड
Q. निरा, पवना, कन्हा, दारणा यापैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही ?
उत्तर: दारणा
Q. कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: मुंबई उपनगर
Q. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: छ. संभाजीनगर
Q. पाताळेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
Q. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अमरावती
Q. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सांगली
Q. मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
Q. घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: चंद्रपूर
Q. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: वर्धा