Maharashtra GK in Marathi
Q. यापैकी चुकीची जोडी सांगा.
कुतुब मिनार – मेहरवली,
गोल घुमट – बिजापूर,
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली,
ताजमहाल – आग्रा
उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली
Q. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ……रोजी झाली.
उत्तर: १ नोव्हेंबर, 1956
Q.माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम महाराष्ट्र राज्याने…….या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरु केली.
उत्तर: COVID – 19
Q.पीतक्रांती कशाशी संबंधित आहे ?
उत्तर: तेलबीया उत्पादन
Q.SEARCH (Society for Education, Action and Research In Community (Health) ही विदर्भातील संस्था कोणत्या प्रसिद्ध दांपत्यामार्फत चालविली जाते ?
उत्तर: डॉ. अभय व राणी बंग
Q.भामरागड येथील नदी संगमात पर्लकोटा, प्राणहिता, पामुलगौतमी, इंद्रावती यापैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
उत्तर: प्राणहिता
Q.राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर: महाराष्ट्र
Q.संत तुकडोजी महाराज यांचा ‘गुरुकुंज आश्रम’ कोठे आहे ?
उत्तर: मोझरी
Q.गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा यापैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?
उत्तर: तापी
Q.महाराष्ट्रात दर….. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.
उत्तर: चार
Q.गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?
उत्तर: नाशिक
Q.महाराष्ट्रातील प्रशासकिय/महसुली विभागांची एकूण संख्या किती ?
उत्तर: सहा
Q.वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर: पसरणी
Q.महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?
उत्तर: गणेश
Q.अहमदनगर – कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तर: माळशेज
Q.एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?
उत्तर: अरुणिमा सिन्हा
Q.महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?
उत्तर: पालघर
Q.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: छत्रपती संभाजीनगर
Q.’नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
उत्तर: जायकवाडी
Q.ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे?
उत्तर: माणिक बंडोजी इंगळे
Q.महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तर: कोयना (सातारा)
Q.भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली ?
उत्तर: मुंबई
Q……….. या डोंगररांगांमुळे तापी – पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
उत्तर: अजिंठा व सातमाळा
Q.कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे ?
उत्तर: तेलंगणा
Q.मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी……….. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
उत्तर: तापी
Q.1948 साली घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: न्या. एस. के. दार
Q.महाराष्ट्र राज्याची पूर्व – पश्चिम लांबी……किमी आहे.
उत्तर: 800 किमी
Q.’कळसुबाई शिखराची उंची……..मीटर आहे.
उत्तर: 1646
Q. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना………..रोजी झाली आहे.
उत्तर: 1 ऑगस्ट 1962
Q. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर: मुंबई